Tuesday, April 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "फडणवीस अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यात..."; राऊतांचा जोरदार प्रहार

Sanjay Raut : “फडणवीस अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यात…”; राऊतांचा जोरदार प्रहार

मुंबई | Mumbai

भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळण्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena UBT) विरोध सुरू आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी जावेद मियाँदाद मातोश्रीवर आल्याची आठवण करून देत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी असून, संपूर्ण भाजप (BJP) हे अर्धवट ज्ञानी आहेत. काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो. त्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचे व्हिडीओ पाहिले पाहिजे. एकवचनी या पुस्तकात बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली. दिलीप वेंगसरकर अचानक जावेद मियाँदला घेऊन मातोश्रीवर आले. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करु नका, पुन्हा सुरु करा, ही विनंती करण्यासाठी ते बाळासाहेबांकडे आले होते. तेव्हा बाळासाहेबांनी दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही”, असे उत्तर त्यांनी फडणवीसांना दिले.

पुढे ते म्हणाले की, “तुमच्या नरेंद्र मोदींसारखी (Narendra Modi) बाळासाहेबांनी शेपूट घातली नव्हती. जर तुम्हाला कुंकवाची कदर असेल, तर अशी विधाने करणार नाहीत. तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरु केली आहे. मात्र तुम्ही तुमच्या आरशामध्ये उघडे नागडे दिसाल. तुम्ही फक्त एकच सांगा पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली आहे. तुम्ही कोणाची तरफदारी करत आहात. काल काही लाडक्या बहि‍णींना राखी बांधून घेतल्यात. ज्या २६ महिलांचे कुंकू पुसले त्या तुमच्या लाडक्या बहिणी (Ladki Bahin) नाहीत का? भाजप म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे. जावेद मियाँदचा विषय किती वर्षे काढता. पंडीत नेहरु काढतात, त्यापेक्षा स्वत:च बोला. तुम्ही स्वत: उघडे नागडे पडले आहात ते पाहा”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

मोदी मते चोरी करून सत्तेत

गेल्या आठ महिन्यांपासून मते गेली तरी कुठे हा प्रश्न अनुत्तरित आहेत. हे बहिणींनी कौल दिल्याचे सांगत आहेत, पण हे मत चोरी करून सत्तेत आले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर हाती घेतला असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेला आहे. मोदी मत चोरी करून सत्तेत आले आहेत. युगांडामध्ये ज्या पद्धतीने ईदी आमीन करत होता. इराकमध्ये सद्दाम हुसेन करत होता, पाकिस्तानात लष्करप्रमुख ज्या पद्धतीने निवडणूका (Election) जिंकतो, रशियात पुतीन जशा निवडणूका जिंकतो तशाच मोदींनी निवडणूका जिंकल्या आहेत, असे म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या