Monday, November 23, 2026
HomeनाशिकIndia Alliance Rally : दिल्लीतील 'वोट बचाओ, देश बचाओ' रॅलीत नाशिक शहर...

India Alliance Rally : दिल्लीतील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ रॅलीत नाशिक शहर काँग्रेसचा सहभाग

नाशिक | Nashik

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (रविवारी) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) ‘व्होट चोर, गद्दी छोड’ या देशव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीचे रक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात नाशिक शहर काँग्रेसने (Nashik City Congress) उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली मोठी ताकद दाखवून दिली.

- Advertisement -

शहराध्यक्ष खैर यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी

नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील मोर्चार्त सहभागी झाले आहेत. यावेळी शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामलीला मैदानावर उपस्थित राहत जोरदार घोषणाबाजी केली.केंद्रातील सरकारविरोधात आणि लोकशाही वाचवण्याच्या समर्थनार्थ देण्यात आलेल्या घोषणांमुळे संपूर्ण आंदोलन परिसर दणाणून गेला होता.

नाशिकहून अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिल्लीत दाखल

या आंदोलनात शहराध्यक्ष बबलू खैरे,अखिल भारतीय अल्पसंख्यांक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयकआकाश छाजेड यांच्यासह गौरव सोनार, स्वप्नील पाटील, अल्तमश शेख, तन्वीर तांबोळी, मतीन पटेल, जावेद इब्राहिम, संतोष ठाकूर, फारुख मन्सुरी आणि शहबाज मिर्झा यांच्यासह अनेक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी देशातील लोकशाही संस्थांची स्वायत्तता अबाधित राखली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने कोणत्याही दबावाशिवाय पूर्णपणे निष्पक्षपणे काम करावे आणि मतदारांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणीही या आंदोलनाद्वारे लावून धरण्यात आली.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...