Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPolitical News : 'आप'ला मोठा धक्का; सात खासदारांच्या भाजपमध्ये विलीनीकरणाला राज्यसभेची मंजुरी

Political News : ‘आप’ला मोठा धक्का; सात खासदारांच्या भाजपमध्ये विलीनीकरणाला राज्यसभेची मंजुरी

नवी दिल्ली | New Delhi

आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) सात राज्यसभा खासदारांनी (Rajyasabha MP) पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय शुक्रवार (दि.२४) रोजी जाहीर केला. यात खासदार राघव चढ्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजिंदर गुप्ता आणि विक्रम साहनी यांचा समावेश होता. चड्ढा यांनी दिल्लीत या सातही खासदारांनी भाजपमध्ये विलीन झाल्याची पुष्टी केली होती. २०२७ मध्ये होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

त्यानंतर आता या सातही राज्यसभा खासदारांच्या विलीनीकरणाला राज्यसभेच्या (Rajyasabha) सभापतींनी मंजुरी दिली आहे. यामुळे भाजपची राज्यसभेत ताकद वाढली आहे. आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सात राज्यसभा खासदारांमुळे भाजपची राज्यसभा सदस्यसंख्या ११३ झाली आहे. पक्षाच्या इतिहासात प्रथमच हा आकडा गाठला गेला आहे. यामुळे आता भाजपचे एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षासाठी हा मोठा असून, त्यांची राज्यसभेतील संख्या १० वरून तीन वर आली आहे. यात सर्व उर्वरीत खासदार हे पंजाबमधील असून, तिथे आम आदमी पक्षाचे बलबीर सिंग सीचेवाल हेच एकमेव खासदार शिल्लक आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आम आदमी पक्षाने राज्यसभा सभापतींकडे याचिका (Petition) दाखल करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच ‘आप’ने असा युक्तिवाद केला आहे की, “पत्रकार परिषद घेणार पहिले तीन खासदार (MP) पक्ष सोडून गेले, तर इतर चार खासदार त्यावेळी उपस्थित नव्हते. अशा परिस्थितीत, हे चार जण मिळून अल्पमतात आहेत आणि त्यांचे पक्ष सोडणे हे पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येते”, असे म्हटले.

चढ्ढा यांनी केले होते ‘आप’वर गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत राघव चढ्ढा म्हणाले होते की, “ज्या आम आदमी पक्षाला मी माझ्या रक्ताने आणि घामाने जोपासले आणि ज्याला मी माझ्या तारुण्यातील १५ वर्षे समर्पित केली, तो पक्ष आता आपल्या तत्त्वांपासून, मूल्यांपासून आणि मूळ नैतिकतेपासून पूर्णपणे भरकटला आहे. हा पक्ष आता देशासाठी किंवा राष्ट्रीय हितासाठी नव्हे, तर केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत आहे. तसेच तुमच्यापैकी अनेकांनी गेल्या काही वर्षांपासून मला हीच गोष्ट वारंवार सांगितली आहे आणि मलाही वैयक्तिकरीत्या असेच जाणवले आहे की, मी एका चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस आहे. म्हणूनच आज मी अशी घोषणा करत आहे की, मी आम आदमी पक्षापासून स्वतःला अलिप्त करत आहे आणि आता जनतेच्या दरबारात जात आहे”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Sanjay Raut : कोणीही कोणाचा नसतो, विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून संजय राऊतांचे सूचक...

0
मुंबई । Mumbai राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीने चांगलाच धुरळा उडवला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांच्या गणितावरून रस्सीखेच सुरू असतानाच, शिवसेना...