Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपेपरफुटी हा चौकशीचा विषय, आंदोलनाच राजकरण करू नका - केंद्रीय मंत्री जे.पी....

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, आंदोलनाच राजकरण करू नका – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा

सरकार चर्चेसाठी तयार

- Advertisement -

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

नीटपेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात दिल्लीतील जंतर मंतर वर सीजेपीचे आंदोलन सुरु असून काल काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसने काल ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर विविध विरोधी पक्षांकडून, देशभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठींबा मिळाला आहे. या सर्व घडामोडी नंतर मंत्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आज रात्री पत्रकार परिषद घेतली.

या वेळी मंत्री जेपी नड्डा यांनी सांगितले की पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय असून त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. संसदेत चर्चा केली जाईल, सीजेपीसोबतही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य आहेत. सरकार या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास करत असून, परीक्षा व्यवस्थेतील जिथे त्रुटी आढळतील त्या दूर केल्या जातील यात सरकार सुरवाती पासूनच चर्चे साठी तयार असून सीजेपी व विरोधी पक्षाने ठरवावे ते ठरवतील त्या वेळेस सरकार चर्चेस तयार असल्याचे त्यांनी म्हण्टले आहे. आंदोलनाच राजकरण करू नये असे ही केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी म्हण्टले आहे.

आम्ही सोनम वांगचूक यांची भेट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या प्रकृतीविषयी आम्ही चौकशी केली. तसेच त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतही आम्ही त्यांना केली. त्यावर मी तुमच्याशी पत्रव्यवहार करतो, असे सांगितले. आता त्यांनी आम्हाला खुले पत्र लिहिले आहे. त्यावर आम्ही उत्तर दिले.तसेच ज्या ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्या त्या राज्यात किती पेपर लीक झाले, याची यादीच जेपी नड्डा यांनी समोर आणली आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...