Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : आगामी काळातील रणनीती ठरणार

Political Special : आगामी काळातील रणनीती ठरणार

अमित शहांच्या बैठकीकडे लक्ष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) दारुण पराभवाचा उट्टा काढण्यासाठी स्थानिकांऐवजी केंद्रीय व परराज्यातील नेते येथील मैदानात उत्तरवून रणनीती आखली जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) नाशिक येथे विभागीय बैठकीत कोणता कानमंत्र देतात? त्यावर पक्षाची वाटचाल ठरणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : “…तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत

स्वपक्षाचा असो अथवा मित्रपक्षांचा त्यासाठी लढणे एवढेच ध्येय असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला विरोधकांनी धूळ चारली. ते राजकीय वातावरण अजूनही फारसे निवळलेले दिसत नाही. म्हणूनच विधानसभेची निवडणूक तारीखही अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, आज ना उद्या ती जाहीर करावीच लागणार आहे. म्हणूनच केंद्रातील नेत्यांचे दौरे राज्यात वाढले आहेत. गुजरातमधून आमदारांनी (MLA) राज्यातील प्रत्येक विधानसभेचा सूक्ष्म अभ्यास करुन तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे.

हे देखील वाचा : दत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी – जयंत पाटील

उत्तर महाराष्ट्रावर (Uttar Maharashtra) राजकीय अर्थाने वर्चस्व मिळवण्यासाठी अगोदर विभागीय मुख्यालय ताब्यात असणे गरजेचे असते.त्यामुळे हा किल्ला सर करण्यासाठी भाजप कंबर कसून मैदानात उतरणार आहे. पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी १९७७ नंतर भाजपकडून सुरुंग लावण्यास सुरवात झाली. प्रत्येक वेळी कोणत्याही एकाच पक्षाच्या किंवा एकाच नेत्यांच्या मागे जाणे मतदारांना कधीही पडले नाही.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्याची मतदारसंख्या ५० लाखांवर; मालेगावची विशेष गती

गेल्या १० वर्षापासून,पूर्व, पश्चिम मतदारसंघात भाजप रोवून आहे. चांदवड व बागलाण मतदारसंघातही प्राबल्य कायम आहे. ते कायम ठेवतानाच मित्र पक्षांनाही आधार देण्याचे काम यावेळी करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वाने चारसो पार करण्यासाठी साम, दाम मदत करुनही पक्षाची झोळी मतांनी का भरली ? त्याचा जाब यावेळी अमित शहा विचारल्याशिवाय राहणार नाही. आगामी काळातील रणनीती बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

दोन दिवस शहा महाराष्ट्रात

भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज २४ सप्टेंबरला ते नागपूर आणि संभाजी नगरचा दौरा करणार आहेत. बुधवारी (दि.२५) दुपारी बाराला त्यांचे नाशिकला आगमन होईल. दीड ते चारच्या दरम्यान ते सातपूर येथील हॉटेल डेमोक्रॉसी येथे भारतीय जनता पक्षांच्या विभागीय बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. नाशिकमधून ते दुपारी पावणेपाचला कोल्हापूरला खाना होतील. तेथेही ते विभागीय बैठक घेणार आहेत. हा त्यांचा पहिला टप्प्यातील राजकीय दौरा आहे. या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन ते करणार आहेत. बैठकीत साधारण ७५० पदाधिकारी उपस्थित असतील, बैठक यशस्वीतेसाठी आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष प्रांत जाधव, सरचिटणीस सुनील केदार, नाना शिलेदार, पवन भगूरकर आदींसह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या