Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद, लष्करानं जाहीर केली नावे.... हल्ल्याचा देशभरातून निषेध

ग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद, लष्करानं जाहीर केली नावे…. हल्ल्याचा देशभरातून निषेध

दिल्ली | Delhi

दहशतवादी हल्ल्यानं जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) पुन्हा हादरलं आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी भारतीय जवानांच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला (Grenade Attack By Terrorists) केला. या दहशतवादी हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे.

- Advertisement -

गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछदरम्यान जात असलेल्या लष्कराच्या ट्रकवर मुसळधार पाऊस आणि परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी ट्रकवर बॉम्ब टाकल्यामुळे आग लागली असावी, असे उत्तरी कमांडच्या मुख्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

घटना घडली ते ठिकाण पूंछपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. शहीद झालेले जवान राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. हल्ला ज्या ठिकाणी झाला, तेथे गेल्या वर्षी दहशतवाद्यांसोबत मोठी चकमक झाली होती. या ठिकाणी आजूबाजूला घनदाट जंगल आहे.

छेडछाडीमुळे कॉलेज युवतीची आत्महत्या

दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) शहीद झालेल्या पाच जवानांची नावे भारतीय लष्करांने जाहीर केली आहेत. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह असे शहीद जवानांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या