Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदिंडोरी : अंबड येथील अंगणवाडीला निकृष्ट पोषण आहार पुरवठा

दिंडोरी : अंबड येथील अंगणवाडीला निकृष्ट पोषण आहार पुरवठा

दिंडोरी । Dindori

तालुक्यातील अंबड येथील अंगणवाडीत दिला जाणारे धान्य निकृष्ट असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अंगणवाडीत आलेला निकृष्ट दर्जाचा पोषण आहार येथील पालकांनी अंगणवाडी सेविकांकडे पुन्हा परत केला.

- Advertisement -

दरम्यान बालकांना पुरवला जाणारा सकस आहार अशा पद्धतीने निकृष्ट असेल तर बालकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो.त्यासाठीच सकस आहाराची संकल्पना मांडलेली आहे. अंबड सारखाच राज्यातील नेक गावांना सकस आहार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाकडून पुरवठा होणारे धान्य हे तपासून दिले जात नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले असून त्यामुळे याचा सेविकांना त्रास होऊ शकतो. जर लहान मुलांनाही या निकृष्ट धान्यातून बाधा झाली तर अधिकारी जबाबदारी घेणार का असा प्रश्न माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी उपस्थित केला आहे.

सदरचा पोषण आहार परत घेऊन उच्चदर्जाचा पोषण आहार तातडीने पुरवावा, निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा करून बालकांच्या आरोग्याशी खेळ करू नका अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या