Friday, May 3, 2024
Homeजळगावयावल तालुक्यात दोघ अल्पवयीन मुलांविरोधात "पोस्को " दाखल

यावल तालुक्यात दोघ अल्पवयीन मुलांविरोधात “पोस्को ” दाखल

यावल Yaval ( प्रतिनिधी )

एका शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनींचा (students) दोघा विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये फोटो (Photos in mobile) काढून लज्जा (shame) उत्पन्न होईल असे कृत्य केले व विनयभंग (Debauchery) केला यामुळे यावल पोलिसात त्या दोघा अल्पवयीन मुलांच्या विरोधात (Against minors) दि .२९ मार्च २२ मंगळवार रोजी “पोस्को (Posco) अंतर्गत ” गुन्हा (crime) दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे

- Advertisement -

यावल तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत 13 वर्षीय विद्यार्थिनी (students) शिक्षण घेते . सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेच्या पायरीवर सावलीमध्ये ही विद्यार्थिनी बसलेली होती .बाहेरगावावरून येणार्‍या दोघं अकरावीच्या सायन्सच्या वर्गात याच शाळेत शिकत असलेल्या दोघा अल्पवयीन मुलांनी (Minors) या विद्यार्थिनीचा शाळेच्या पायर्‍यांवर बसलेली असताना फोटो (photo) काढला व हात धरून विनयभंग (Debauchery) केला .

यामुळे सदर प्रकारामुळे विद्यार्थिनींनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या (Headmaster) कानी हा विषय टाकला सदर मुख्याध्यापकांनी या मुलांना ताकीद देऊन त्यांच्याकडून लेखी करून घेतले व सदरच्या मोबाईल मधून फोटो डिलीट केले.

आज या मुलीवर प्रसंग ओढवला आणखी या विद्यार्थ्यांना मोकळीक सोडल्यास या पुढे ते असेच काम करतील व संस्था बदनाम होऊ नये हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून विद्यार्थिनीच्या पालकांनीं (parents) हे प्रकरण आई-वडील व नातेवाईकांनी चक्क यावल पोलीस स्टेशन गाठले आणि याबाबत या विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून यावल पोलीस (police) स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आल्याने दोघं अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या यावल पोलीस स्टेशन मध्ये भाग 5 गु .र. न . 125 / 2022 भादवि कलम 354 ( अ ) ( ड ) बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण व अधिनियम 2012 चे 8, 11, 12, 16 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर दोघा विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पठाण हे करीत आहेत

सदर विद्यार्थिनींची महिला दक्षता समिती (Women’s Vigilance Committee) पुढे जळगाव येथे आज जाब जबाब नोंद होणार असल्याचे कळते तर या प्रकारामुळे यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून मागील पंधरा दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकाने (teacher) विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले होते या संदर्भात शाळा शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी गटविकास अधिकारी यावल पंचायत समितीकडे तक्रार गेल्याने पंचायत समिती(Panchayat Samiti) प्रशासनाने सदर शिक्षकाला पुढील आदेश होईपावेतो निलंबित केले आहे .

ज्या शाळेत आता या विद्यार्थिनींच्या संदर्भात प्रकार घडला या शाळेतील व्यवस्थापन समिती (Management Committee) आता नेमकी काय कठोर पावले उचलते याकडे संपूर्ण विद्यार्थिनींचे पालक व शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या