Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा बंद; शेतकऱ्यांचा संताप

रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा बंद; शेतकऱ्यांचा संताप

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

- Advertisement -

ओझे l विलास ढाकणे Oze

दिंडोरी तालुक्यात महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली असून रोज थ्री फेज वीजपुरठ्या मध्ये सुद्धा दोन तासाचे लोडशेडिंग केले जात आहे. तालुक्यात शनिवारी अनेक ठिकाणी थ्री फेज वीज पुरवठ्याचे वेळापत्रक असून सुद्धा दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवस तसेच रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असतो त्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे सध्या दिंडोरी तालुक्यात सर्वत्र बिबट्यांचा धुमाकूळ चालू असून हे बिबटे लहान मुलाना आपले भक्ष करीत आहे मात्र महावितरण कंपनीला ग्राहकांच्या सुरक्षेची किंचितही काळजी नाही उलट महावितरण कंपनी व वन विभागाचा काही संबंध नाही असे उत्तरे महावितरण कंपनीच्या काही अधिकारी वर्गाकडून दिली जात आहे.

अनेक वेळा संबंधीत महा वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करूनही या संदर्भात दाखल घेतली जात नाही. दिंडोरी तालुक्यात ९०% गावातील जनता मळ्यामध्ये आपल्या शेतात राहतात त्याच प्रमाणे कादवा नदीचा परिसर ऊस शेतीचा असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रात्री उशिरापर्यंत विजपुरवठा पुरवठा बंद असल्यास मळ्यातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यांमुळे महावितरण कंपनीने यांची दखल घेणे आवश्यक आहे.

काही अधिकारी चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना उत्तरे देतात त्यांमुळे उपकार्यकारी अभियंता दिंडोरी उपविभाग निलेश नागरे यांनी आपल्या अधिकारी वर्गाला समज देणे महत्वाचे असून थ्री फेज वीज पुरवठ्यामध्ये दुरुस्तीची कामे करू नये अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...