Sunday, May 5, 2024
Homeनगरशेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा; नेवाशात महावितरणवर मोर्चा

शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा; नेवाशात महावितरणवर मोर्चा

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना कुठल्याच शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक दोन महिन्याला शेतकर्‍यांकडून सक्तीने पाच हजार रुपये वसूल केले जात आहे, अशी टीका माजी खासदार तुकाराम गडाख यांनी केली आहे.

- Advertisement -

माजी खासदार तुकाराम गडाख यांनी अजित पवार यांनी मागे केलेल्या एका भाषणाची आठवण करून दिली. शेतकर्‍यांची वीज कोणी कापली तर मी पवारांची अवलाद नाही असे त्यांनी म्हटले होते, असा दावा त्यांनी केला.

वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. काकडे, श्री. बडे व श्री. चकोर यांनी निवेदन स्वीकारले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी तसेच अंकुशराव काळे, राजू मते, प्रताप चिंधे, गोरक्षनाथ कानडे, बापूसाहेब देशमुख ,रावसाहेब राक्षे, ज्ञानेश्वर पेचे, नगरसेवक सचिन नागपुरे, हरिभाऊ तागड, मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दादा देशमुख आदींची भाषणे झाली. भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या