Friday, September 11, 2026
Homeदेश विदेशअफगाणिस्तान भूकंपाने हादरला! ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी

अफगाणिस्तान भूकंपाने हादरला! ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी

दिल्ली । Delhi

अफगाणिस्तानमध्ये रविवारी रात्री शक्तिशाली भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत किमान सात जणांचा मृत्यू झाला असून, १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या भूकंपाचा सर्वाधिक फटका बल्ख प्रांतातील भागांना बसला आहे. प्रांतीय प्रवक्ते हाजी झैद यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे मजार-ए-शरीफ (Mazar-e-Sharif) शहराच्या एका भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती कोसळल्याची शक्यता आहे.

आरोग्य विभागाचे प्रवक्ते समीम जोयांडा यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, सोमवार सकाळपर्यंत सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून १५० हून अधिक जखमींना तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालांवरून मृतांची ही संख्या निश्चित करण्यात आली आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

यूएसजीएसने (USGS) त्यांच्या स्वयंचलित पेजर सिस्टीमवर (Pager System) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भूकंपाच्या परिणामांची माहिती देणाऱ्या या प्रणालीनुसार, या भूकंपामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असून, आपत्तीचे स्वरूप मोठे असू शकते.

भारतीय एजन्सी नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (NCS) नुसार, या भागात भूकंपाचे दोन मोठे धक्के जाणवले. पहिला धक्का रविवारी (२ नोव्हेंबर २०२६) रात्री २०:४०:५२ वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. दुसरा धक्का पहिल्या धक्क्यानंतर अवघ्या पाच तासांतच हिंदूकुश प्रदेशात ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली भूकंप झाला. अफगाणिस्तान हा भूकंपांसाठी अत्यंत संवेदनशील प्रदेश असल्याने, अशा आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्याची गरज अधिक तीव्र झाली आहे.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना ‘एस. एस....

0
नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२६ : जिमाका वृत्तसेवा Nashik सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक...