मुंबई | Mumbai
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी हे दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके संपूर्ण राज्यभर दौरे काढत आहेत. अशातच आता राष्ट्र्वादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी आरक्षणाविषयी माध्यमांशी बोलतांना मोठे विधान केले आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश
यावेळी पटेल म्हणाले की, “आरक्षणाला (Reservation) जर धक्का लागला तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेईल. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. तसेच या देशात आरक्षण, हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही”, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर
तसेच “लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election) उगीचच अपप्रचार एवढा झाला की लोकं बळी पडले. मात्र,आता लोकांच्या लक्षात आलेले आहे. आणि आमच्यासारखे अनेक जे कोणी संसदेत (Parliament) संविधानाची शपथ घेऊन बसलेले आहेत ते असे होऊ देणार नाही असे स्पष्ट वक्तव्यही प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्यासोबतच निवडणुकीच्या (Election) काळात आरक्षणाचा मुद्दा विरोधक पुढे करत आहेत. आमचे सरकार मराठ्यांना आरक्षण मिळालेचं पाहिजे, या मागणीवर ठाम आहेत. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित होऊन कायदा देखील बनला आहे. तसेच दहा टक्के आरक्षण देखील दिले आहे”, असेही पटेल यांनी म्हटले.
हे देखील वाचा : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुमो गाडीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
त्याबरोबरच “मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही तर फार जुना आहे.वर्षानुवर्ष या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे. ज्यांच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात (Maharashtra) राहिलेले आहेत. अनेक पक्षात राहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आरक्षण दिले नाही.पंरतु,आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका केली जात आहे. कारण ते स्वतः आरक्षण देऊ शकलेले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळात चूका काढत बसायच्या हा एकच मुद्दा विरोधकांकडे”, असल्याची टीकाही प्रफुल्ल पटेल यांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा