Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBacchu Kadu : 'प्रहार'चे अध्यक्ष बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; विधानपरिषदेसाठी उमेदवारी...

Bacchu Kadu : ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई | Mumbai

‘प्रहार’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शिंदे सेनेचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर काल पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज (गुरुवारी) सकाळी शिंदे आणि कडू यांचा फोनवरून संवाद झाला होता. यानंतर आता कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, ते विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

- Advertisement -

विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) दहा जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि.३० एप्रिल) रोजी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) दोन दिवसांपूर्वीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. तर महायुतीमधील (Mahayuti) शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झालेला नव्हता. यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून, त्यांनी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांना उमेदवारी दिली आहे.

हे देखील वाचा : Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी; तर शिंदे सेनेकडून बच्चू कडू अर्ज भरणार

दुसरीकडे शिंदे सेनेच्या (Shinde Shivsena) वाट्याला विधानपरिषदेच्या दोन जागा आल्या होत्या. त्यापैकी आता एका जागेवर बच्चू कडू हे अर्ज भरणार आहेत. तर दुसऱ्या जागेसाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलतांना “मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे म्हटले होते. तसेच माझ्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व शिवसेनेने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मी प्रामाणिकपणे काम करत राहील असेही त्यांनी स्पष्ट केली होते. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भाजपकडूनही उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी काल (मंगळवारी) भाजपने सुनिल कर्जतकर, डॉ. माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी दिली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून (Congress) भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.

ठाकरे सेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे सेनेने (Shivsena UBT) उद्धव ठाकरे यांच्याऐवजी माजी आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विधानपरिषदेसाठी उमेदवार असणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या आधीही दानवे यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले आहे. त्यामुळे आता मविआतील घटक पक्ष असणारे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी (Congress and NCP SP) अंबादास दानवे यांच्या नावाला सहमती दर्शवितात का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम-

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ४ मे २०२६
मतदानाची तारीख – १२ मे २०२६
मतदानाची वेळ – सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी – १२ मे २०२६ संध्याकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख – १३ मे २०२६

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून...