Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPrakash Mahajan: शिंदे गटात प्रवेश घेताच प्रकाश महाजानांची ठाकरे बंधुंवर टीका; म्हणाले,...

Prakash Mahajan: शिंदे गटात प्रवेश घेताच प्रकाश महाजानांची ठाकरे बंधुंवर टीका; म्हणाले, अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र…

मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेसह ६ ठिकाणच्या महापालिकांसाठी मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे तर दुसरीकडे राज्यातील काही ठिकाणी महायुती आणि मविआची आघाडीबाबत अद्याप निर्णय होत नाहीये. अद्याप एकाही पक्षाने आपले जागावाटप जाहीर केले नाहीये. त्यामुळे इच्छुकांसह माजी नगरसेवकांमध्ये धाकधुक वाढली आहे. असे असतानाच आज मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे बंधुंवर निशाणा साधला.

प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. अंधारात एकटे जाण्यापेक्षा दोघे भाऊ एकत्र जाऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, पण त्यांच्या नशिबी अंधार चुकणार नाही टीका प्रकाश महाजनांनी केली. तसेच एकनाथ शिंदे हे रात्री कितीही वाजता भेटणारे नेते आहेत, बाकी लोक ‘औषध’ घेऊन लवकर झोपतात असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

- Advertisement -

त्यांचा मोठेपणा मला खूप भावला
पुढे ते म्हणाले, मी शिवसेनेत परत आलो आहे. मी यापूर्वी शिवसेनेत उपनेता होता. पण एकनाथ शिंदे यांचं वैशिष्ट आहे की, ते या शिवसेनेचे प्रमुख असूनही स्वत:ला शिवसेनेचा नेताच समजतात. हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला. काल रात्री मी त्यांना 12.30 वाजता भेटलो, तेव्हा ते मला फार उत्साहाने भेटले. एका मराठी माणसाला मराठी माणूस रात्री 12.30 वाजता ही या महाराष्ट्रासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरे म्हणजे या पक्षप्रवेशाचं श्रेय कोणाला द्यायचे असेल तर मंगेश चिवटेला देईन. ते आरोग्यदूत आहेतच, पण ते माझ्यासाठी राजदूत झालेले आहेत. तुमचे कार्य मी पाहत आलेलो आहे. मंगेश चिवटे यांनी मला तुमचे फार मोठे कार्य दाखवले आणि ते बघून मला आश्चर्य वाटले.

हे ही वाचा: Prashant Jagtap: “राजकारण बंद करेन पण काँग्रेसमधून…”; प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कुणी कंबरेवर हात ठेऊन कुणाचा वारस होऊ शकत नाही
दोन्ही बंधूंनी हिंदुत्व सोडले असून जागावाटप जाहीर होऊ द्या, त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली. शिंदे साहेबांनी त्यांच्या कामातून वारसा सिद्ध केला. कुणी कंबरेवर हात ठेऊन कुणाचा वारस होऊ शकत नाही असा टोला प्रकाश महाजन यांनी ठाकरेंना लगावला. यापुढे जर कुणी शिंदे साहेबांवर टीका केली तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

एकनाथ शिंदेंचे कौतूक
प्रकाश महाजन म्हणाले की, ज्या रुग्णांना तुम्ही मदत करून रोगमुक्त केलं, जीवदान दिलं, त्या रुग्णांनी तुमचे आभार मानण्यासाठी जी पत्रे पाठवली आहेत, त्या सर्वांचं वजनचे १०० किलो आहे. असे दृष्य यापूर्वी किती मुख्यमंत्री होऊन गेले आणि त्यांनी दाखवले हे मला माहित नाही. हे काम तुम्ही इतक्या शांततेने केले आणि कुठेही त्याचा गाजावाजा केला नाही. एखादा देवदूत जसे कोणाला मदत पाहिजे असेल, त्यांच्या उशाला गपचूप ठेवून निघून जातो. तुम्ही गपचूप ठेवून निघून गेलात तरी लोक तुम्हाला विसरणार नाहीत. माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती आणि आपण (एकनाथ शिंदे) हिंदुत्वाविषयी खूप जागृत आहात आणि हिंदुत्ववादी आहात, त्यामुळे आपण मला प्रवेश दिला त्याबद्दल धन्यवाद मानले.

एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना प्रकाश महाजन म्हणाले की, “माझी इच्छा हिंदुत्वावर काम करायची होती आणि शिंदेसाहेब हिंदुत्वाविषयी खूप जागरूक आहात. एकनाथ शिंदे हे खरोखरच हिंदुत्ववादी आहेत. मुख्यमंत्री पदाच्या काळात मला तुमचे खूप कौतुक वाटते. जातीयवादाने महाराष्ट्र पेटला असताना शिंदेंनी त्यांच्या कुशल नेतृत्वाने परिस्थिती हाताळली. एखादे गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जाते आणि रात्री दीड वाजता मुख्यमंत्री तिथे पोहोचतो. या महाराष्ट्रात असे काही मुख्यमंत्री झालेत की त्यांनी घर सोडले नाही, जे परीक्षेला बसले नाहीत ते पहिले आलेत.”

ताज्या बातम्या

Baramati By-Poll : “काँग्रेसने बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही, भाजप मुद्दाम…”;...

0
मुंबई । Mumbai बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे....