Sunday, June 14, 2026
Homeक्राईमPranjal Khewalkar Case: महिलांचे गुपचूप अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले; प्रांजल खेवलकरांचा...

Pranjal Khewalkar Case: महिलांचे गुपचूप अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले; प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात, नवा गुन्हा दाखल

पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात सध्या कोठडीत असलेला डॉ. प्रांजल खेवलकर आणखी अडचणीत सापडला आहे. संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेसोबतच्या शारीरिक संबंधांचे गुपचूप व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये शेकडो अश्लील व्हिडीओ आणि फोटो असल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता या प्रकरणात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी, एका महिलेच्या तक्रारीनुसार खेवलकरने तिची संमती न घेता व्हिडिओ आणि फोटो काढले, असा आरोप आहे. या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी आयटी अॅक्ट 66E आणि BNS कलम 77 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. खेवलकर याच्या मोबाईलमध्ये १,४९७ फोटो आणि २५२ व्हिडीओ सापडले आहेत. यापैकी २३४ फोटो आणि १९ व्हिडीओ अत्यंत अश्लील असून काहींमध्ये परप्रांतीय महिलांचा आणि मोलकरणींचा समावेश आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्यावर पुणे पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांद्वारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहमती नसताना फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा खेवलकर यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे केवळ अश्लीलता नव्हे, तर सायबर गुन्ह्यांचं स्वरूपही स्पष्ट होतंय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...