Thursday, May 2, 2024
Homeजळगावप्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी साधला रूग्णांशी संवाद

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी साधला रूग्णांशी संवाद

रोशन होले

फैजपूर – प्रतिनिधी Faizpur

- Advertisement -

कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी व आव्हानाचा सामान करण्यासाठी आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याचे कार्य अनेक डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस कर्मचारी व शासकीय अधिकारी करीत आहे. “मानवसेवा आज खरा धर्म” हा आदर्श ठेवून अनेक अधिकारी आपले प्राण धोक्यात घालून या कोरोना महामारीशी झगडत आहे, लढत आहे.

त्यात अधिकारी म्हणजे फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, फैजपूर पोलीस उपविभागीय आधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, ए.पी.आय.प्रकाश वानखडे, तालुका वैद्यकीय अधिकारि डॉ.हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकक्षक कौस्तुभ तळले व त्यांचे सहकारी कर्मचारी या महाभयंकर संकटाचा सामना करीत आहेत.

या संकटावर मात करण्याची शकस्त करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी उन्हा तान्हाची तमा न बाळगता हे सर्व अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांन सह एखाद्या देवदूता प्रमाणे कार्य करीत आहेत. केंद्र व राज्य सरकार कडून आलेल्या परिपत्रकाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करून या महामारीला रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. महामारीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार, प्रसार माध्यमे, संपादक पत्रकार, शिक्षकवृंद यांचे या संबंधातले कार्य पाहून त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले प्रयत्नशील आहेत.

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी कोरोना योद्धांना नुकताच सन्मानपत्र देऊन गौरव केला व त्यांचा आत्मविश्वास वाढवला. मानव जातीच्या कल्याणासाठी झडणाऱ्या या सर्व कोरोना योध्यानकडे बघून म्हणावेसे वाटते ” तेथे कर माझे जुळते ”

जागतिक रोग कोरोनाला पराभूत करण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या योगदानास कोणीही नाकारू शकत नाही.

परिसरातील आबाल वृद्धांना कोरोना रोगा विषयक योग्य ती माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व त्यांचे सहकारी देत आहेत. याला नागरिकांसाठी नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांनासामावेत अहोरात्र झटत आहेत. याचा योग्य तो परिणामही परिसरात दिसत आहे.

कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व योध्यानसाठीच प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले प्रयत्नशील आहेत जेव्हा सामान्य नागरिक त्याना विचारतात साहेब आपण थोडी विश्रांती घ्या तेव्हा हे अधिकारी म्हणतात आता विश्रांती कोरोना संपल्यावरच ..! सर्व समाजात या अधिकाऱ्यांचे कौतुक होत असून प्रत्येक जीव वाचविण्याची त्याची दडपड, अपार प्रयत्न, दिवसरात्र मेहनत आणि समाज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान निश्चितच अभिनंदनय आहे. सर्व नागरिकांना म्हणतात कोरोना होऊ नये म्हणून प्रयत्नशील राहा हा आजार आपल्याला होणार नाही या भ्रमात कोणी राहू नका कोविड ला हरवायचे असेल तर प्रत्येकाने शिस्त पाळलीच पाहिजे सर्व स्तरातून या अधिकाऱ्यानची कौतुक होत आहे या सर्व अधिकाऱ्यांना फैजपूर व परिसर वासीयांचा त्रिवार सलाम ..!

- Advertisment -

ताज्या बातम्या