Tuesday, January 6, 2026
HomeनगरPolice Transfers : खैरेंची नाशिकला बदली, कलबुर्गे नगरचे अपर अधीक्षक

Police Transfers : खैरेंची नाशिकला बदली, कलबुर्गे नगरचे अपर अधीक्षक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने शुक्रवारी (27 जून) जारी केले असून, त्यानुसार अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत अपर अधीक्षक पदावर झाली आहे. त्यांच्या जागी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रशांत खैरे यांनी अहिल्यानगर येथे अडीच वर्षे कार्यरत राहत अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले होते. त्यांच्या कार्यशैलीचे विविध ठिकाणी कौतुक झाले. आता ते नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीत नवीन जबाबदारी सांभाळणार आहेत.त्यांच्या जागी श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे हे अहिल्यानगर येथे रूजू होणार आहेत. मात्र, कलबुर्गे यांची बदली झाल्यामुळे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षकपद सध्या रिक्त झाले आहे. लवकरच या पदासाठीही नवीन नियुक्ती अपेक्षित आहे.

YouTube video player

दरम्यान, ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांची बदली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. तर नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असलेल्या शर्मिला घार्गे यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उप आयुक्तपदी करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी केलेल्या बदल्या या 83 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या असून, गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांवर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...