Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनदीपात्रात बुडून गर्भवती महिलेचा मृत्यू

नदीपात्रात बुडून गर्भवती महिलेचा मृत्यू

पिंपळदर | वार्ताहर Pimpaldar

- Advertisement -

बागलाण तालुयातील आराई शिवारातील कोकणी पाडा येथे आराम नदी पात्रात भांडी व कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिला पाय घसरून नदीपात्रात पडून खोल पाण्यात बुडाल्याने तिचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आराई शिवारातील कोकणी पाडा येथील रहिवासी वैशाली सुनील पवार (२०) ही गर्भवती महिला दुपारी भांडे व धुणे धुण्यासाठी आराम नदीकाठी गेली असता,अचानक तिचा पाय घसरला आणि ती नदीच्या खोल पाण्यात बुडाली परिसरात कोणीही नसल्यामुळे या दुर्दैवी घटनेत तिचा बुडून मृत्यू झाला.

थोड्या वेळाने त्या परिसरात काही मुले खेळण्यासाठी गेली असता, त्यांना नदीपात्रात वैशालीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी आरडाओरडा करत गावकर्‍यांना सूचित केले. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी जमा झाले. अथक प्रयत्नांनंतर वैशालीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉटरांनी तपासणी केल्यानंतर तिला व पोटातील गर्भाला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हिरालाल खांडेकर, विशाल जाधव पुढील तपास करीत आहेत

ताज्या बातम्या

टाकळीभान येथे पाटचारीच्या पाण्यात पडल्याने तरूणाचा मृत्यू

0
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ऋषिकेश नामदेव कांबळे ( वय 30) या तरूणाचा पाटचारी नं.16 च्या वाहत्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे....