Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain : राज्यातील 'या' भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट

मुंबई | Mumbai

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे या पावसाचा फटका भात आणि द्राक्षासह इतर पिकांना बसला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. नुकतेच हवामान विभागाने (Meteorological Department) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे…

- Advertisement -

नाशिक-मराठवाडा पाणी संघर्ष पेटणार; उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस

या अवकाळी पावसाने सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी यासह इतर जिल्ह्यांत (Districts) हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli District) पलूस आणि जत तालुक्यातील उमदी भागात पहाटेपासून पाऊस सुरु आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस बरसला असून अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर शेतकऱ्यांनी मळणीसाठी शेतात ठेवलेल्या भाताच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Aaditya Thackeray : मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? सदा सरवणकरांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

दरम्यान, अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभे ठाकणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ओबीसी आरक्षणाला स्थगितीची उच्च न्यायालयाकडे मागणी; आज सुनावणी होणार

- Advertisment -

ताज्या बातम्या