Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशपुढची १० ते २० वर्षे पंतप्रधान मोदींना पर्याय नाही - बाबा रामदेव

पुढची १० ते २० वर्षे पंतप्रधान मोदींना पर्याय नाही – बाबा रामदेव

दिल्ली l Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील १०-२० वर्षे पर्याय नसल्याचे सांगत राहूल गांधी यांनी त्रियोग तर दिग्वीजय सिंह या मौनयोग करावा असा खोचक सल्ला आज योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे. बाबा रामदेव एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

- Advertisement -

मुलाखती दरम्यान बाबा रामदेव यांना प्रश्न विचारण्यात आला होता की देशात मोदी फॅक्टर आहे का? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की, “कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सगळ्या देशाला हे ठाऊक आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळालं आहे. ” असंही बाबा रामदेव म्हणाले. इतकंच नाही तर भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या १० ते २० वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असं दिसत नाही.

तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर होतो असं जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे. असं उत्तर बाबा रामदेव यांनी दिलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या