Saturday, October 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नाशिकमध्ये सभा

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नाशिकमध्ये सभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्याशुक्रवारी (दि. 8) दुपारी 2 वा. पंचवटीतील मोदी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांसाठी होणारी ही पहिलीच सर्वात मोठी सभा असल्याने या सभेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे. हरियाणातील विजयाने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोदींच्या भाषणातून देशाच्या विकासाचे सुनियोजित चित्र जनतेपुढे मांडले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाने जनहितार्थ केलेल्या कामामुळे राज्यात महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकेल. त्या दृष्टीने मोदी सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व संघजन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य प्रदीप पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ महाकुंभमेळा : नाशिकमध्ये उद्या ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद

0
नाशिक । जिमाका वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मंगलक्षण जवळ येत असताना नाशिकमध्ये उद्या (ता. २५) गोदातीरावर ५०१ शंखांचा निनाद घुमणार आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवमामलेदार...