Saturday, October 24, 2026
Homeक्रीडाक्राइस्टचर्चमध्ये भारताचा विजयी 'तिलक'! न्यूझीलंडच्या हातातून विजय अक्षरशः खेचून घेत थरारक विजयाची...

क्राइस्टचर्चमध्ये भारताचा विजयी ‘तिलक’! न्यूझीलंडच्या हातातून विजय अक्षरशः खेचून घेत थरारक विजयाची नोंद

मुंबई | Mumbai
न्यूझीलंडच्या हातातून विजय अक्षरशः खेचून घेत भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात थरारक विजयाची नोंद केली. क्राइस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार विकेट्सनी पराभव केला. विजयासाठी शेवटच्या षटकात ११ धावांची गरज असताना तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मेळ साधत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

न्यूझीलंडने दिलेल्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खुपच खराब झाली होती. संजू सॅमसन १४ तर अभिषेक शर्मा २७ धावा करून बाद झाले होते. त्यानंतर वैभव सूर्यवंशी मैदानात आला होता, पण तो अवघ्या ४ धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ कर्णधार श्रेयस अय्यर देखील ७ वर बाद झाला होता. त्यानंतर मैदानाता आलेला अक्षर पटेल देखील ११ धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या ७० धावांत ५ विकेट पडल्या. त्यामुळे टीम इंडियाचा डाव पुर्णपणे फसलेला, टीम इंडिया इथून पुढेल जिंकेल की नाही, अशी आशा कमी होती. मात्र तिलक आणि नितीश यांनी सामना पूर्ण फिरवला.

- Advertisement -

तिलक वर्माने सुत्र हातात घेत सामना फिरवला
अशावेळेस तिलक वर्माने सामन्याची सुत्र हातात घेतली. त्याच्यासोबत नमन धीर देखील होता. याआधी पहिल्या टी20 सामन्यात नमन धीरने टीम इंडियाला सामना जिंकून दिला होता. त्यामुळे यावेळेस देखील तो अशीच कामगिरी करेल असेच वाटत होते. त्यानुसार तो खेळला देखील आणि तो १७ धावांमध्ये ३१ धावा करून बाद झाला. पण तिलकने सामना धरुन ठेवला. भारताला शेवटच्या तीन षटकांत ४६ धावांची गरज होती, त्यावेळी तिलक वर्माने आक्रामक फलंदाजी करत १८ व्या षटकांत १७ धावा काढल्या. त्यानंतर १९ व्या षटकांत त्याने १८ धावा काढल्या. शेवटच्या षटकांत संघाला ११ धावांची आवश्यकता होती. यावेळी तिलक वर्मा आणि नितीश या जोडीने १ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना भारताला ४ विकेटने जिंकून दिला.

Tilak 𝐂𝐋𝐔𝐓𝐂𝐇 Varma 🫡

The #TeamIndia Vice-Captain walks away with a well-deserved POTM award 👏

Scorecard ▶️ https://t.co/FZtUFIFWS2

#NZvIND https://t.co/zyfDlnctxQ— BCCI (@BCCI) October 24, 2026

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने ४३ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ७० धावांची खेळी केली, तर बेव्हॉन जॅकोब्सने ५८ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने २ बळी घेतले.

तिलक वर्मा सामनावीर
दडपणाच्या परिस्थितीत नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या तिलक वर्माला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने २६ चेंडूंत नाबाद ५१ धावा करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नितीश रेड्डीने १३ चेंडूंत नाबाद २६ धावा करत त्याला मोलाची साथ दिली.

न्यूझीलंडच्या सँटनरने चार विकेट्स घेतल्या, तरी अखेरच्या षटकांतील भारतीय फलंदाजांचा आक्रमक खेळ रोखण्यात यजमान संघाला यश आले नाही.

ताज्या बातम्या

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून नव्या आयुष्याची सुरुवात; ‘नवचेतना’...

0
नाशिक | Nashik एकल महिलांना सन्मान, आत्मविश्वास आणि नव्या आयुष्याची संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, नाशिकच्या वतीने थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या २००...