Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी सोमवारी साधणार संवाद

पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी सोमवारी साधणार संवाद

सार्वमत

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी 27 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाबाधितांचे आकडे बदलत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कसे रोखता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांनी याआधी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करत काही ठिकाणी अटी शिथिल केल्या होत्या. 20 एप्रिलनंतर निर्बंध थोडेफोर शिथिल केले गेले. ज्या परिसरात जास्त कोरोनाचे रुग्ण नाही, त्या भागाचे झोन तयार करून उद्योगांना अटी-शर्थींवर सुरुवात करण्याची मुभा देण्यात आली होती. राज्य सरकारने ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोन अशी विभागणी करून राज्यात व्यवहार सुरू केले आहे. यात रेड झोनमधील जिल्ह्यात बंदी कायम आहे.

या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर लॉकडाऊनबाबत आणि कोरोना लढ्याबाबत पुढील भूमिका ठरवली जाणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत पत्रक जारी केले आहे. त्यानुसार, मोदींसोबतच्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव, आरोग्य विभागाचे सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांनी हजर राहायचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या