Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याखासगी कोविड रूग्णालये सेवा करणार बंद

खासगी कोविड रूग्णालये सेवा करणार बंद

नाशिक । प्रतिनिधी

खासगी रूग्णालयांना असलेल्या अडचणी तसेच डॉक्टर व कर्मचारीवर्ग मानसिक व शारिरीक दृष्टीनेही थकल्याने आता खासगी कोविड रूग्णायातील सेवा बंद करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नाशिक हॉस्पिटल ओनर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबतची निवेदने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांना देण्यात आली आहेत. यामध्ये म्हटले आहे की, गेली दीड वर्षांपासून कोविड साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वजन प्रयत्नशील आहोत. शासकीय स्तरावरून करण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन खासगी कोविड रूग्णालयांनी केले. तसेच चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला.

करोना पॉझिटिव्हचे प्रमाण कमी करण्यात तसेच मृत्यूदर कमी राखण्यात खासगी कोविड रूग्णालयांचे मोठे योगदान आहे.

आता कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. उर्वरीत रूग्ण सांभाळणे शासकीय तसेच निमशासकीय रूग्णालय यंत्रणांना शक्य आहे. खासगी कोविड रूग्णालयांना वैयक्तीक अडचणी आहेत.

तसेच आता डॉक्टर व सर्व कर्मचारी मानसिक तसेच शारीरीक दृष्टीने थकले असल्याने खासगी कोविड रूग्णालयांनी ही सेवा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात गरज पडल्यास पुन्हा आम्ही सेवेसाठी सज्ज असू मात्र आता जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी यात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या