Friday, May 3, 2024
Homeनाशिकमनपा प्रशासनाकडून वाढीव खाटांची व्यवस्था

मनपा प्रशासनाकडून वाढीव खाटांची व्यवस्था

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात मार्च महिन्यात 33 हजारावर नवीन करोना रुग्ण आढळून आल्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या तीन दिवसात 6 हजार 968 नवीन रुग्णांची भर पडली आहे. करोना प्रकोप सुरु झाला असुन दररोज दोन हजाराच्यावर नवीन रुग्ण समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडुन चार दिवसापुर्वी नवीन दहा खासगी रुग्णालयांत खाटा आरक्षित केल्यानंतर शनिवारी पुन्हा 12 रुग्णालयातील 175 खाटा आरक्षित करुन वाढीव खाटांची व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

दरम्यान कोविड रुग्णालयात काल (दि.4) सायंकाळी सव्वा वाजेपर्यत केवळ 7 खाटा शिल्लक असल्याचे वास्तव समोर आले आहे. नाशिक जिल्ह्याचा संसर्ग वेग राज्यात सर्वाधिक मानला जात असून या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा व महापालिका प्रशासन यंत्रणेकडुन तातडीच्या उपाय योजना सुरू झाल्या आहे. काल पर्यंत शहरातील रुग्णांचा आकडा 1 लाख 21 हजाराच्यावर गेला आहे. 1 हजार 1166 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महापालिका क्षेत्रात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांचा आकडा 17 हजार 472 च्यावर जाऊन पोहचला आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे.करोना केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाकडुन काम सुरू झाले आहे. यात शहरातील ठक्कर डोम व संभाजी स्टेडीयम याठिकाणी 200 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. यानंतर शनिवारी 12 खासगी रुग्णालयातील 175 खाटा मनपाकडुन आरक्षित करण्यात आल्या आहे. यात 15 आयसीयु, 127 ऑक्सिजन, 33 व्हेंटीलेटर (बॉयपॅपसह) अशा खाटांचा समावेश आहे.

यात कृष्णा हॉस्पिटल, सुयोग चाईल्ड कॅनडा कॉर्नर, समर्थ हॉस्पिटल पाथर्डी फाटा, जिवन ज्योत हॉस्पिटल, श्री कलावती हॉस्पिटल सातपूर, श्री तुळजाभवानी हॉस्पिटल चुंचाळे, रिध्दी हॉस्पिटल मुंबईनाका, अंकुर मॅटर्निटी कामटवाडे, सोमानी हॉस्पिटल नवीन नाशिक, डॉ. खरे हॉस्पिटल अमृतधाम पंचवटी, एच. एस. जी. मानवता मुबंईनाका व कृष्णा हॉस्पिटल पंचवटी अशा खासगी रुग्णालयाचा समावेश आहे. यामुळे आता प्रत्येक विभागात काही खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचार घेता येणार आहे.

कोविड रुग्णालयात केवळ 7 खाटाच शिल्लक

नाशिक महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णालय म्हणुन जाहीर असलेल्या कोविड खाटा आरक्षित असलेल्या नाशिकरोड नवीन बिटको रुग्णालय, डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, एमव्हीपी मेडीकल कॉलेज रुग्णालय, आपोलो, अशोका, साह्याद्री व व्होक्हार्ट अशा रुग्णालयातील 810 आरक्षित खाटात केवळ 7 खाटा शिल्लक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या