Thursday, March 13, 2025
Homeक्राईमसावेडीतील व्यावसायिकाची आठ कोटी 34 लाखांची फसवणूक

सावेडीतील व्यावसायिकाची आठ कोटी 34 लाखांची फसवणूक

‘मेक माय ट्रीप’ कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले कमिशन देण्याचे आमिष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

‘मेक माय ट्रीप’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले कमिशन देऊ असे आमिष दाखवून सावेडी उपनगरातील एका व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी 34 लाख 63 हजार 209 रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. अनुज अनिल मित्तल (वय 50 रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
सदरची घटना जानेवारी 2024 ते 12 सप्टेंबर 2024 दरम्यान अहमदनगर क्लब येथे घडली असून या प्रकरणी मित्तल यांनी मंगळवारी (29 ऑक्टोबर) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल दर्शन जगताप, एंजेल राहुल जगताप व सुशीला दर्शन जगताप (सर्व रा. सानपाडा, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

अनुज मित्तल यांची राहुल जगताप सोबत एका खासगी कंपनीमुळे ओळख झाली होती. राहुल व एंजेल यांनी अनुज यांना विश्वासात घेतले. तुम्ही आमच्या बरोबर ‘मेक माय ट्रीप’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले कमिशन देऊ असे असे आमिष दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनुज यांनी वेळोवेळी रोख रक्कम 10 कोटी 11 लाख 19 हजार 629 रूपयांची गुंतवणुक केली. सदरची रक्कम अनुज यांनी सुशीला जगताप हिच्या नावावरील बँक खात्यावर पाठविली. त्या रकमेवर अनुज यांना ऑगस्ट 2024 पर्यंत दोन कोटी 48 लाख 56 हजार 420 रूपये दिले गेले. यामुळे अनुज यांचा विश्वास संपादन करण्यास मदत झाली. त्यानंतर अनुज यांनी वेळोवेळी गुंतवलेल्या रकमेची, सोन्याच्या दागिन्याची तसेच अनुज यांच्या नावावर असलेल्या टोयोटो कंपनीच्या हायलॅक्स या मॉडेलची कार (एमएच 16 डिके 5749) व के्रडीट कार्डची वारंवार मागणी केली.

परंतू राहुल, एंजेल व सुशीला यांनी अनुज यांनी गुंतवणूक केलेली रक्कम, त्यावर मिळणारे कमीशन, सोन्याचे दागिने, क्रेडीट कार्ड, कार यापैकी काहीच दिले नाही. त्यामुळे अनुज यांची खात्री झाली की, संशयित आरोपी राहुल जगताप, एंजेल जगताप व सुशीला जगताप यांनी अनुज यांचा विश्वास संपादन करून त्यांना चांगल्या फायद्याचे आमिष दाखवून एकुण आठ कोटी 34 लाख 63 हजार 209 रूपयांची फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...