Friday, May 3, 2024
Homeजळगावदुचाकीची अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढीचा निषेध

दुचाकीची अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढीचा निषेध

जळगाव – Jalgaon

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवा विभागातर्फे केंन्द्र शासनाचा निषेध करीत आज आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी पेट्रोल, डिझेलच्या इंधनाची भाववाढ विरोधात विना पेट्रोलची दुचाकी मोटरसायकलची अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केन्द्र शासनाच्या दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखिल करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाघ्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रविंद्र नाना पाटील, स्वप्निल नेमाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या