Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशकात रयत क्रांती संघटना आक्रमक; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात 'कांदा भाकरी' आंदोलन

नाशकात रयत क्रांती संघटना आक्रमक; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ‘कांदा भाकरी’ आंदोलन

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कमालीचे कोसळले आहेत. पिकासाठी होणारा खर्च आणि त्यातून हाती येणारे उत्पन्न हे अतिशय विषम आणि असमाधानकारक आहे त्यामुळे विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे…

- Advertisement -

या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात कांदा भाकरी आंदोलन करत, निवेदन सादर करून शासनाचे लक्ष वेधले आहे. या निवेदनामध्ये काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

मध्यप्रदेश मध्ये गेल्या ३ वर्षांपासून भावांतर योजना चालू आहे. त्या धरतीवर महाराष्ट्रात भावांतर योजना चालू करून १५०० रुपये दर निश्चित करून बाजार समितीमध्ये जो कांदा १५०० रुपयांच्या खाली विक्री होईल त्याची उर्वरित रक्कम लगेच शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यात वर्ग करावी.

पहिल्या अधिवेशनात भूमिका काय? सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं

निर्यात अनुदान व देशांतर्गत वाहतूक अनुदान मिळावे, नाफेडची खरेदी मार्च महिन्यात सुरु करावी, ३० रुपये प्रती किलोप्रमाणे खरेदी केली जावी. उत्पादन खर्चाप्रमाणे दर मिळावेत यांसारख्या मागण्या निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मनीष सिसोदियांच्या अटकेविरोधात मुंबईत AAP आक्रमक

येणाऱ्या आठ दिवसात याविषयी निर्णय झाला नाही तर रयत क्रांती संघटना महाराष्ट्रात मोठे आंदोलन करेल, असा इशाराही संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिला आहे. यावेळी शिवनाथ जाधव, जगदीश नेरकर, विशाल पवार, वाल्मिक सांगळे, निवृत्ती कुवर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या