Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएका पोस्टमुळे कोल्हापुरात रणकंदन! पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

एका पोस्टमुळे कोल्हापुरात रणकंदन! पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

कोल्हापुर | Kholapur

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील मुख्य चौकात दोन गटात राडा झाल्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी आज घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे.

- Advertisement -

कायदा सुव्यवस्थेचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने १९ जून पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात राडा पाहायला मिळाला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की पाहायला मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात जमावाने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले आहेत.

“राज्यात दंगली घडवल्या जाताहेत, सरकारचेच…”; शरद पवारांचा गंभीर आरोप

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजघटकांना इशारा दिला. “असलं धार्मिक उदातीकरण खपवून घेणार नाही. कोल्हापूर प्रकरणात अधिक खोलात जावं लागलं,” असे फडणवीस म्हणाले. कोल्हापुरात विरोधीपक्षातील एका नेत्याने काहीतरी घडणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काही संबध आहे का, हे तपासण्यास येईल, असे फडणवीस म्हणाले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे, येथील परिस्थितीत नियंत्रणाखाली आणा, असा आदेश सरकारने कोल्हापूर पोलिसांना दिला आहे.

संगमनेरमधील ‘भगवा’ मोर्चाला गालबोट, समनापूरात तुफान दगडफेक

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम संघटनांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुस्लिम संघटनांनी याबाबत कोल्हापूर पोलिसांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय मुस्लिम संघटनांनी कोल्हापुरकरांना शांततेचं आवाहन केलं आहे.मुस्लिम संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून कोल्हापुरातील मुस्लिम समाज जगत आहे. राजर्षी शाहू महाराज यांचं शहर असलेल्या कोल्हापुरात काही समाजकंटकांनी शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शहराचं सामाजिक सौंहर्द आणि शांतता बिघडवणाऱ्यांना पाठिंशी घातलं जाणार नाही, पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करत त्यांना ठेचून काढावं अशी मागणी मुस्लिम संघटनांनी पत्राद्वारे केली आहे. समाजकंटांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरकरांनी शांतता, एकोपा आणि बंधुभाव बिघडू देऊ नये, असं म्हणत मुस्लिम संघटनांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन करत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. असे सांगत, जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन फडणवीस यांनी केल आहे. तसेच, कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करा अशी सूचनादेखील दिली आहे. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. ताक्ताळ परिस्थिती नियंत्रणात आणा. असे निर्देश गृहविभागाने दिले आहेत. यासोबत खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांवरही बारीक नजर ठेवा अशी सूचनाही पोलिसांना देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या