Wednesday, February 19, 2025
Homeनगरपोलिस उपनिरीक्षक वाघ यांना राष्ट्रपती पदक

पोलिस उपनिरीक्षक वाघ यांना राष्ट्रपती पदक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा पोलिस दलातील उपनिरीक्षक राजेंद्र देवमन वाघ यांना उल्लेखनीय व प्रदीर्घ सेवेसाठी 26 जानेवारीला भारतीय गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. वाघ यांनी पोलिस दलात 34 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी बजावत गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. उपनिरिक्षक वाघ यांनी आता सराईत गुन्हेगारी टोळ्यांचा पर्दाफाश केला असून परराज्यातील 188 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन 101 देशी बनावटीचे पिस्तुल आणि 263 जिवंत काडतुसे जप्त केलेली आहे. जिल्ह्यात गाजलेल्या 154 दरोड्यांमध्ये सहभागी गुन्हेगारांना अटक करून 74.81 लाख रुपयांचा चोरीचा माल जप्त केला.

- Advertisement -

36 मोठ्या घरफोडी प्रकरणातील 156 गुन्हेगारांना अटक करून दीड कोटी रुपयांचा चोरीस गेलेला माल हस्तगत केलेला आहे. तसेच 74 अट्टल फरार गुन्हेगारांना ताब्यात घेत 60 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना पकडलेले आहे. तसेच 11 वर्षांपूर्वीचा खुनाचा गुन्हा उघड करून आरोपींना अटक होती. 20 सराईत गुन्हेगारांकडून 120 मोटारसायकली जप्त करत शाळकरी मुलींच्या दुहेरी खुनातील आरोपीला फाशीपर्यंत पोहोचवले. कांडेकर खूनप्रकरणी गोवा व पुणे येथून तीन शार्प शुटर्सना अटक व जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यशस्वी झालेले आहे. वाघ यांच्या सर्तकतेमुळे नगरच्या शिवजयंती मिरवणुकीदरम्यान मोठा घातपात टाळला होता.

यावेळी 15 आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात वाघ यांना यश आले होते. शिर्डी येथील प्रतिष्ठित कुटुंबाच्या दोन मुलांचे अपहरण व खून प्रकरणातील 12 आरोपींना अटक त्यांनी केली होती. भरोसा सेल येथे कार्यरत असताना 125 कौटुंबिक प्रकरणे सोडवून त्यांचा संसार पुन्हा सुरू पुन्हा उभा केला. तसेच 1 हजार 148 तरुणांचे यशस्वी समुपदेशन त्यांनी केले होते. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत 370 बक्षिसे व 1 लाख 64 हजार 800 रोख रक्कम मिळाली आहे. वाघ यांच्या प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कर्तव्य भावनेने नगरच्या पोलिस दलाच्या प्रतिमेला उंची मिळाली.

वाघ यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अहिल्यानगर जिल्ह्याचे अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूरचे अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक अशोक राजपूत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या