Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस राजकीय भेटीची चर्चा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक...

उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस राजकीय भेटीची चर्चा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक झाल्याचे नाकारले

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, फडणवीस यांनी अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे सांगत ही चर्चा निराधार ठरवली.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. या एकमेव जागेवर उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी करावी, असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आग्रह आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी २२ एप्रिल रोजी मध्यरात्री वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा प्रबुद्ध भारत या माध्यम समूहाने केला आहे. या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी नाशिक येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचे असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपूनछपून करण्याची आवश्यकता नाही. खुलेपणाने आम्ही भेटू शकतो. तसे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवयाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्यामुळे अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही. जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देणाऱ्या खोटारड्या हँडल्सवर नोटीस बजावली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट होऊन चर्चा झाली का याचे उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतात. माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? कारण अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, असे सांगत राऊत यांनी भेटीच्या चर्चेतील गूढ आणखी वाढवले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...