Friday, April 3, 2026
Homeनाशिकपीयूसी प्रमाणपत्र दर ‘जैसै थे’

पीयूसी प्रमाणपत्र दर ‘जैसै थे’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रदूषण नियंत्रण चाचणी (पीयूसी) प्रमाणपत्राचे दर अद्याप वाढविण्यात आले नाही.

- Advertisement -

दरवाढीचा एकतर्फी निर्णय कोणीही घेऊ नये, असे राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले आहेे.

काही संघटनांनी दर वाढविण्याची मागणी केली असली तरी, शासन स्तरावर त्याबाबतचा निर्णय झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

पीयूसीचे प्रमाणपत्राचे दर वाढविण्यात यावे, अशी मागणी मुंबईतील एका संघटनेने केली आहे.

त्या बाबतचे निवेदन त्यांनी परिवहन विभागाला सादर केले आहे. तसेच एक ऑक्टोबरपासून नव्या दराने ग्राहकांकडून शुल्क वसूल करण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र, त्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने अद्याप मान्यता दिलेली नाही. दरवाढ करण्यासाठी एक प्रक्रिया असते. त्यानुसार ती पूर्ण होते.

संघटनेने किंवा कोणी मागणी केली की, लगेच दरवाढ होत नाही. दरवाढ करण्याची ज्या-ज्या संघटनांची मागणी असेल त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल. त्यानंतर दरवाढीच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करून निर्णय घेईल.”, असे ढाकणे यांनी सांगितले आहे.

राज्यात प्रदूषण नियंत्रण चाचणी करणारी सुमारे 12 हजार केंद्र आहेत. दुचाकीच्या पीयूसी प्रमाणपत्रासाठी 35 रुपये, पेट्रोल वाहनांसाठी 90 रुपये, डिझेल वाहनांसाठी 110 रुपये आणि रिक्षासाठी 60 रुपये सध्या आकारले जातात. राज्य सरकारने हे दर 2011 मध्ये निश्चित केले आहे. त्यानंतर त्यात वाढ झालेली नसल्यामुळे या दरांत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

बारामती

Baramati Rahuri Election: बारामती, राहुरीत काँग्रेस उमेदवार उतरवणार; हायकमांडकडून ग्रीन सिग्नल

0
मुंबई | Mumbaiउपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. ही...