Friday, May 3, 2024
Homeनगरपुण्यात अडकलेले 54 विद्यार्थी मनसेच्या मदतीने नगर आणि सातार्‍याला पोहोचले

पुण्यात अडकलेले 54 विद्यार्थी मनसेच्या मदतीने नगर आणि सातार्‍याला पोहोचले

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षार्थींसाठी मनसेनं अजून दोन खासगी ट्रॅव्हल बस सोडल्या. बुधवारी नगर आणि सातार्‍याला 54 विद्यार्थी खाजगी बसमधून स्वगृही परतले. मनसे विद्यार्थी सेनेने आतापर्यंत जळगाव दोन, नगर दोन आणि नाशिकला एक बस रवाना केलेली आहे.

- Advertisement -

सात बसेसच्या माध्यमातून आतापर्यंत 164 विद्यार्थ्यांना घरी रवाना करण्यात आले तर अजून नगर आणि सातार्‍याला तीन बस पाठवल्या जाणार आहे. आतापर्यंत मनसेनं विद्यार्थ्यांसाठी एक लाख 70 हजार रुपये बसेससाठी खर्च केलेत.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हातात पोस्टर घेऊन बस चालू करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री महोदय, आम्हा विद्यार्थ्यांसाठी मोफत बस चालू करा,अशा मागण्यांचे फलक हातात घेत मनसे विद्यार्थी सेनेनं सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार आणि परिवहन विभागाच्या बदलत्या धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. त्यामुळे अनेक राजकीय संघटना विद्यार्थ्यांसाठी खासगी बसचे नियोजन करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या