Friday, May 3, 2024
Homeराजकीयपुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची उद्या मतमोजणी

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची उद्या मतमोजणी

पुणे –

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी 3 डिसेंबरला होत असून प्रशासनाने या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली आहे. पुण्यातल्या

- Advertisement -

बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे.दरम्यान, मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी 18 हॉल तर शिक्षक मतदार संघासाठी 6 हॉल आहेत. त्‍यानुसार स्‍वतंत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, रो (रांग) अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक हॉलमध्‍ये 7 टेबल असतील. त्‍याप्रमाणे पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक व 126 शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी 42 पर्यवेक्षक 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्‍ती करण्‍यात आलेले आहेत. पदवीधरसाठी (राखीवसह) एकूण 855 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 305 अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. सुरक्षेसाठी 450 पोलीस अधिकारी-कर्मचारी उपलब्‍ध असणार आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्‍या पहाता मतमोजणीला 36 तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेवून प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे. मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.पुणे विभागात पदवीधर मतदार संघातल्या पाच जिल्ह्यात2लाख 47हजार 50 इतके मतदान झाले असून एकूण मतदानाच्या 57.96 टक्के मतदान झाले आहे तर शिक्षक मतदारसंघात 52 हजार 987 मतदान झाले , एकूण मतदानाच्या 73.04 टक्के मतदान झाले आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्‍या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्‍या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या