Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रभांडकुदळ नवरोबांना ‘संस्थात्मक क्वारंटाईन’चा इशारा

भांडकुदळ नवरोबांना ‘संस्थात्मक क्वारंटाईन’चा इशारा

सार्वमत

पुणे (प्रतिनिधि) – पुण्यात लॉकडाऊन दरम्यान हिंसाचाराची प्रकरणं वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. समज देऊनही न ऐकणार्‍या भांडकुदळ नवरोबांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी पुणे जिल्ह्यात ग्रामस्तरीय महिला दक्षता समितीफ गठीत करण्यात आली आहे. समितीत ग्रामपंचायत महिला सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्य, अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असेल. ग्रामपंचायतीमधील ज्येष्ठ महिला या समितीची प्रमुख असेल.

कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडल्यास पतीचं समुपदेशन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र समुपदेशन केल्यानंतरही काही सुधारणा न झाल्यास संबंधित पतीला संस्थात्मक करावं, यासाठी पोलीस निरीक्षकांची मदत घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे.
गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याशी समन्वय साधावा, महिला दक्षता समितीला सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...