सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शहरातील तीन रुग्णालये कोरोना बाधित रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. त्यामुळे आता शहरातील वसतिगृह अधिग्रहित केली जात आहेत. पुण्यातील 74 वसतीगृह आणि 300 शाळा कोरोना रुग्णांसाठी सज्ज केल्या जात आहेत.
पुण्यात कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात गुरुवारी दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक 104 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील तीन रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. त्यामुळे आता शहरातील वसतिगृह अधिग्रहित केली जात आहेत. पुण्यातील 74 हॉस्टेल्स, 300 शाळा कोरोना रुग्णांसाठी सज्ज केल्या जात आहेत.
दरम्यान, कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती आणि अनेक धार्मिक स्थळेदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. पुण्याच्या भवानी पेठ, नाना पेठजवळ आझम कॅम्पस हे एक प्रार्थनास्थळ आहे. या कॅम्पसच्या व्यवस्थापकांनी प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे. कॅम्पसमधील प्रार्थनास्थळाची इमारत संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात यावी, अशी कॅम्पस प्रशासनाची इच्छा आहे.
पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन भवानी पेठ, नाना पेठला लागून असणार्या आझम कॅम्पसच्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती. कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी तसे पत्र 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले होते. त्यानुसार आझम कॅम्पसमधील प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत सर्व सुविधांसह आता जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
कॅम्पसमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था कॅम्पसच्यावतीने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलीस आणि शासकीय कर्मचार्यांची व्यवस्थादेखील कॅम्पसकडून करण्यात येणार आहे. पुण्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही भवानी पेठेत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भिती आहे. या आठवड्याच्या शेवटी 1500 आणि 15 मे पर्यंत तीन हजार पर्यंत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील 14 खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु असून दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयांशी करार केला जात आहे.
कोरोना रुग्णांसाठी 74 हॉस्टेल अधिग्रहित असून त्यामध्ये 43 हजार रुग्णांची क्षमता आहे. तर 300 शाळांमध्ये 20 हजार नागरिकांची सोय करण्याचे नियोजन आहे. दिलासादायक म्हणजे, मॅथेमॅटिक मॉडेलनुसार अपेक्षित रुग्ण वाढलेले नाहीत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे पोलिसांनी कडक कारवाई (र्झीपश ऋळसहींी उेीेपर) करण्यास सुरुवात केली आहे.




