Tuesday, July 28, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : पुण्यात गँगवॉर भडकले! भरदिवसा थरकाप गोळीबार, वनराज आंदेकर हत्येचा...

Pune Crime : पुण्यात गँगवॉर भडकले! भरदिवसा थरकाप गोळीबार, वनराज आंदेकर हत्येचा बदला?

पुणे । Pune

सांस्कृतिक आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा (Gangwar) भडका उडाला आहे. पुण्यातील धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथे आज बुधवारी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या थरारक प्रकारामुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून परिसरात प्रचंड तणावाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय उर्फ बाळा मस्के असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वी पुण्यात गाजलेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एका मुख्य आरोपीचा अक्षय हा सख्खा भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा हल्ला आंदेकर आणि कोमकर टोळीतील जुन्या वैमनस्यातून तसेच वर्चस्वाच्या लढाईतून झाल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा वर्तुळात सुरू आहे.

हे नाट्य बालाजीनगर येथील बस स्टँड परिसरात घडले. अक्षय मस्के हा नेहमीप्रमाणे परिसरात असताना, अचानक आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याला गाठले आणि त्याच्यावर थेट गोळीबार केला. हल्लेखोरांनी अतिशय जवळून हा हल्ला केला. गंभीर जखमी झालेला अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. भरचौकात घडलेल्या या घटनेनंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे (Crime Branch) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला आहे. टोळीयुद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेता, बालाजीनगर आणि आसपासच्या परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिक स्तरावर नावलौकिक उंचवणार – राज्यपाल जिष्णू देव...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे राज्यापाल जिष्णू देव वर्मा यांनी कौतुक केले....