Thursday, May 7, 2026
HomeनगरAhilyanagar : पुणे-नगर रेल्वेचा डीपीआर सादर

Ahilyanagar : पुणे-नगर रेल्वेचा डीपीआर सादर

38 किलो मीटर अंतर होणार कमी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला आहे. या मार्गासाठी खा. नीलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता. या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर 38 किलोमीटरने कमी होईल. सध्या दौंडमार्गे नगरचे अंतर 154 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाची प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. प्रवाशांच्या या मागणीची दखल घेत लंके यांनी संसदेमध्ये पाठपुरावा सुरू केला.

- Advertisement -

अहवालानुसार या मार्गासाठी सुमारे 11 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टीकोनातूनही तो फायदेशीर राहील असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतुद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्ग 116 किलोमीटर लांबीचा असून नगर ते पुणेदरम्यान 11 स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी 11 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून पुणे-वाघोली-शिक्रापुर, रांजणगांव, कारेगांव, शिरूर, सुपा, चास- केडगांव या मार्गाने हा रेल्वेमार्ग अहिल्यानगर रेल्वेस्थानकाशी जोडला जाणार आहे.

पुणे-अहिल्यानगर प्रवास फक्त 90 मिनिटात होणार

11 हजार कोटींचा प्रकल्प मंजूर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे शहरे एकमेकांशी जोडण्यासाठी आणि वाहतूक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकल्पांचे महत्त्व अन्यन्यसाधारण आहे. अगदी याचप्रमाणे जर आपण पुणे ते अहिल्यानगर या शहरांचा विचार केला तर या दोन शहरादरम्यान रेल्वेने प्रवास करायला साधारणपणे 154 किलोमीटरच्या अंतर पार करावे लागते.

या पार्श्वभूमीवर या दोन शहरात दरम्यान नवीन रेल्वेमार्ग उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. पुणे ते अहिल्यानगर दरम्यान होणार्‍या या रेल्वे मार्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या या दोन्ही शहरांच्या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्गाला हा रेल्वेमार्ग समांतर असणार आहे. साधारणपणे हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही शहरातील अंतर 38 किलोमीटरने कमी होणार असून नवीन रेल्वेमार्ग 116 किलोमीटर लांबीचा असणार आहे व याकरिता 11000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सध्या जर आपण रस्तेमार्गाने पुणे ते अहिल्यानगर दरम्यानच्या प्रवासाची स्थिती बघितली तर वाहन कोंडीमुळे या ठिकाणी तीन ते साडेतीन तास सहज लागतात. परंतु येणार्‍या काळात हा नवीन रेल्वेमार्ग झाला तर प्रवासाचा कालावधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार असून या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास फक्त दीड ते पावणे दोन तासातच पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रवासांचा वेळ वाचण्यास मदत होणार असून प्रवास देखील आरामदायक व किफायतशीर होण्यास मदत होणार आहे.

त्यासोबतच या रेल्वे मार्गाचा फायदा शेती आणि उद्योगांना देखील होईल. जर शेती मालवाहतुकीसाठी रेल्वेचा पर्याय बघितला तर तो एक स्वस्त पर्याय म्हणून ओळखला जातो. हा नवीन रेल्वेमार्ग झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांचा माल पुण्यासारख्या बाजारपेठेमध्ये सहज पोहोचवता येणार आहे. यासोबतच रांजणगाव व सुपा येथे एमआयडीसी केंद्र आहेत. या केंद्रांना देखील औद्योगिक दृष्टिकोनातून मालवाहतूक करण्यासाठी या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे.

कसा असणार हा रेल्वेमार्ग ?
या नवीन रेल्वेमार्गाची एकूण लांबी 116 किलोमीटर असून या अंतरात 11 स्थानके असणार आहेत व नऊ किलोमीटर अंतराचा एक बोगदा देखील असणार आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी अकरा हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता असून या रेल्वे मार्गाचा रूट जर बघितला तर तो पुणे, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, कारेगाव, सुपा, चास आणि केडगाव असा असणार आहे. तसेच हा दुहेरी रेल्वेमार्ग असणार असून संपूर्ण विद्युतीकरण देखील करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ मे २०२६ – तामिळनाडूचा नवा जननायक

0
तामिळनाडूच्या राजकारणाने गेल्या सहा दशकांपासून एक ठराविक साचा जोपासला होता. १९६७ नंतर या राज्याने ‘द्रविडीयन’ विचारधारेच्या पलीकडे जाऊन कधी विचार केला नाही. अण्णा दुराई,...