Friday, April 25, 2025
Homeक्राईमवाहन चालकाचा खून करून कारची चोरी

वाहन चालकाचा खून करून कारची चोरी

मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावर फेकला

घारगाव |वार्ताहर| Ghargav

भाड्याने घेतलेली चारचाकी चोरण्याच्या उद्देशाने चालकाचा खून (Driver Murder) करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) संतवाडी शिवारातील आळेखिंडीतील वनविभागच्या (Forest Department) जंगलात फेकून देण्याची घटना मंगळवारी (28 जानेवारी) दुपारी उघडकीस आली आहे. राजेश बाबुराव गायकवाड (वय 56 वर्षे) रा. निधी अर्पाजमेंट जेलरोड नाशिक ता. जि. नाशिक असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे येथून चालक राजेश गायकवाड मारूती सुझुकी कंपनीची ईरटीगा कार एमएच 15 जेडी 5193 या गाडीने पुणे ते सिन्नर एमआयडीसी असे भाडे घेवुन येत असताना मौजे संतवाडी शिवारात ता. जुन्नर जि. पुणे येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चालक गायकवाड यांचा त्यांचे हात पाठीमागील बाजुन नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टाय (लॉक) याने बांधुन ते चालवत असेलेली ईरटीगा चोरी करण्याचे उददेषाने, गळा दाबुन खुन केला. व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह संतवाडी शिवारात वनविभागाच्या ओढयात टाकुन दिला, अशी फिर्याद मृत चालक गायकवाड यांचा मुलगा अंकुश राजेश गायकवाड याने आळेफाटा पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली आहे.

दरम्यान आळेफाटा पोलिसांनी तपास सुरु केला असून गायकवाड यांची कार नेमकी पुणे येथून कोणी भाड्याने घेतली होती याचा तपास सुरु आहे. पोलीस महामार्गावरील सीसीटीव्ही तपासत आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...