मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्याप्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वैष्णवी हिचे सासरे आणि त्यांच्या मुलावर मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केले आहे.
राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली होती. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि नणंदला अटक करण्यात आली असून, सासरा आणि दीर फरार आहेत. पोलिसांच्या चार पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेली (Ajit Pawar) आहे. तसेच पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) यांच्या घरात घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निषेध व्यक्त करतो. वैष्णवी हगवणेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माझा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कुठे चुकत असेल तर त्याला टायरमध्ये घालून मारलं पाहिजे” अशी भूमिका अजित पवारांनी (Ajit Pawar) वारंवार बोलून दाखवलेली आहे. या पार्श्वभूमीवर काल (२१ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन करून राजेंद्र हगवणेवर कडक कारवाई करावी व त्याला त्वरित अटक करावी अशा सूचना दिल्याची माहिती मिळत आहे.
शवविच्छेदन अहवालात नेमकं काय?
राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांकने पत्नी वैष्णवीला पाइपने मारहाण केली असून, शवविच्छेदनात तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे वैष्णवीचा खून झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिश्मा यांच्या पोलिस कोठडीत २६ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील फरार आहेत.