पुणे | Pune
पुण्यात गुंडगिरीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी रात्री पुण्यात एका माजी नगरसेवकाची गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने हत्या केली. चार ते पाच बाईकवरुन आलेल्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादावरून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वनराज आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वनराजच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरुन वनराजचा खून करण्यासाठी त्याच्याच बहिणींनी आणि मेव्हण्याच्या सांगण्यावरुन हा कट केल्याचे फिर्यादित म्हंटले आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून हा खून केल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बहिणी आणि वनराजच्या वडिलांसोबत प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते. काल जयंत आणि गणेश कोमकर यांनी मिळून सोमनाथ गायकवाड याला सांगून वनराजचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार, संध्याकाळी ८.३० वाजता नाना पेठेत वनराजवर गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला होता.
आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. त्याच्या रागातून सख्ख्या मेव्हण्याने वनराज आंदेकर याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना ‘तुला पोरं बोलवून ठोकतेच’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, वनराज याची नवी पेठमध्ये हत्या झाल्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली आहे. ही घटना घडल्यानंतर पुणे पोलीसांवर पुन्हा एकदा संशय निर्माण झाला होता . पोलिसांनी प्रकरणाची गांभिर्य पाहता तात्काळ कारवाई करत अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहे. यामध्ये दोन्ही सख्या बहिणींचाही समावेश आहे. संपत्तीसाठी वनराज यांना संपवल्याचे तपासात उघड झाले. सख्या बहिणी आणि मेव्हण्यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा