Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रमोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे उद्या होणार प्रस्थान

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे उद्या होणार प्रस्थान

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखी प्रस्थान सोहळयासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकोबारायांच्या सोहळयास 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
श्री संत तुकाराम महाराज मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मंदिरात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रस्थान सोहळयासाठी गावात कोणीही भाविक व वारकऱयांना सोडण्यात येणार नाही. त्यासाठी गुरुवारपासून गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटे चारला विठ्ठल-रुक्मिनी मंदिरात काकड आरती व अभिषेक महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व विश्वस्तांच्या उपस्थितीत होईल. साडेचारला श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा होईल. पाचला वैंकुठगमन मंदिरातील महापूजा संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सहाला पालखी सोहळयाचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पूजा होईल. नऊला सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्मयावर घेऊन भजनी मंडपात आणतील. दहाला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळयापूर्वी आजोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. काल्याच्या कीर्तनानंतर सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री विठ्ठल रुक्मिनी यांची भेट घालून कीर्तन मंडपात प्रस्थान ठिकाणी आणतील. दुपारी दोनला प्रस्थान सोहळयाला सुरुवात होईल.
संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते विधिवत परंपरेप्रमाणे प्रस्थान होणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली. प्रस्थान झाल्यानंतर पादुका पालखीमध्ये ठेऊन मंदिराला प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी कीर्तन मंडपात ठेवून सायंकाळी सहाला समाज आरती, कीर्तन, जागर होईल. शुक्रवारी वारकऱयांनी, ग्रामस्थांनी गर्दी करू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावला आहे, असे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले.

- Advertisement -

नियमांचे पालन करणे बंधनकारक
दरम्यान, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, तुकोबांच्या पालखीचे शुक्रवारी, तर माउलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान होईल. या सोहळयाकरिता मंदिर परिसराच्या आतमध्ये जास्तीत 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. देहू व आळंदीचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचना व निर्देशाप्रमाणे सोहळयात सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जुंतकीकरण आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.

माउलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान, पादुका आजोळघरी ठेवणार
माउलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान होत असून, मुख्य मंदिरात परंपरागत पूजा करण्यात येणार आहे. ही सर्व विधिवत आणि पारंपरिक पूजा मोजक्मया प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी गुरुवारी दिली. आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळयासंबंधी देवस्थान विश्वस्थांसोबत बैठक पार पडली आहे. सोहळा परंपरागत करायचे ठरले असले, तरी प्रशासनाने परवानगी दिलेले प्रतिनिधी प्रस्थानाला उपस्थित राहतील. 13 जून रोजी दुपारी चारनंतर पादुकांची आरती होऊन पादुका आजोळघरी ठेवण्यात येतील. 13 ते 30 जून या कालावधीत पादुका त्याच मंडपात राहतील. मात्र, यावेळी नागरिकांना पादुकांचे दर्शन घेण्यास परवानगी नसेल. प्रशासनाने दिलेल्या पर्यायानुसार पादुका आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला रवाना होतील.

ताज्या बातम्या

स्टिंग

Narhari Zirwal: स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधान भवनात चर्चा, मंत्री नरहरी झिरवाळांचा...

0
मुंबई | Mumbaiगेल्या काही काळात स्टिंग एनर्जी ड्रिंक हे शितपेय तरुणांसोबत लहान मुलांमध्येही कमालीचे लोकप्रिय झाले आहे. एनर्जी ड्रिंक म्हणून हे पेय तरुणांमध्ये लोकप्रिय...