Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात मोकाट फिरणार्‍यांची 5,930 वाहनं जप्त तर 2,727 जणांवर गुन्हा

पुण्यात मोकाट फिरणार्‍यांची 5,930 वाहनं जप्त तर 2,727 जणांवर गुन्हा

पुणे (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकवेळा आवाहन करून आणि सांगूनही न ऐकणार्‍या व लॉक डाऊनफच्या काळात प्रशासनाला सहकार्य न करता मोकाट फिरणार्‍यांना पुणे पोलिसांनी चांगलीच अदद्ल घडवली आहे. पोलिसांनी पुण्यात तब्बल 121 ठिकाणी नाकेबंदी करण्यात केली आहे. तसेच आत्तापर्यंत कलम 188 अंतर्गत 2 हजार 727 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोकाट फिरणार्‍या तब्बल 9 हजार 335 नागरिकांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 5 हजार 930 वाहने जप्त केल्याची माहिती, सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली.

शुक्रवारी (3 एप्रिल) एका दिवसात 429 जणांवर 188 कलमांAतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 1 हजार 435 नोटीस बजावत 1 हजार 301 गाड्या जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून शहरातील इमारतींच्या टेरेसवर गर्दी करणार्‍यांवर आतापर्यंत 20 गुन्हे दाखल केले आहेत. ड्रोनची संख्या वाढवून आणखी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही रविंद्र शिसवे यांनी दिला.

- Advertisement -

पोलिसांच्या पेट्रोलिंग करणार्‍या वाहनातूनही मोकाट फिरणार्‍यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे. या माध्यमातूनही दोषींवर गुन्हा दाखल होणार आहे. याव्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि जास्त दराने विक्री करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल केल्याचं शिसवे यांनी नमूद केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या