Friday, May 3, 2024
Homeनगर22 जून पासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस - पंजाब डख

22 जून पासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस – पंजाब डख

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

शेतकर्‍यांना दिलासा देणारी बातमी 8 जून पासून महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार असून 22 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविला आहे ते संगमनेर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते.

- Advertisement -

संगमनेर येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना पंजाब डख म्हणाले की, 9 आणि 10 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडणार असून रविवार पासून संगमनेरकडे पाऊस पडणार नसून तो पाऊस संगमनेरकडून नगर जिल्ह्याकडे पडणार आहे. त्याच बरोबर 10 तारखेपर्यंत राज्यात असेच वातावरण असणार आहे. त्यानंतर 11,12,13 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 13,14,15 ला पुन्हा हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर 16, 17, 18 एप्रिलला पुन्हा राज्यात पावसाचे वातावरण होणार आहे. त्याच बरोबर मे महिन्यातही दोनदा अवकाळी पाऊस पडणार आहे.

2023 मध्ये हवामान अंदाज देणार्‍या काही संस्था आहे, त्या म्हणतात की दुष्काळ पडणार आहे, असा त्यांचा अंदाज आहे, पण माझा अंदाज हा वेगळा आहे, मी स्वतः अभ्यास करतो त्यामुळे माझ्या अंदाजानुसार जसा 2022 ला पाऊस झाला तसाच 2023 मध्ये पाऊस पडणार आहे म्हणून ही खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. 8 जूनला पावसाचे आगमन होणार आहे. तो पाऊस 22 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे, आणि 27,28 जूनला सर्व शेतकर्‍यांच्या पेरण्या झालेल्या दिसतील. जून पेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्येही आणखीन जास्त पाऊस आहे. यावर्षी 26 ऑक्टोबरला थंडी येणार असा अंदाजही यावेळी हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविला आहे.

हवामान अभ्यासक पंजाब डख यांना फेसबुक अकाउंट बद्दल माहिती विचारली असता त्यांनी सांगितलं कि मी कोणतं फेसबुक अकाउंट वापरत नाही, माझ्या नावाने कोणीतरी फेसबुक अकाउंट चालू केले असून त्यावर येणार्‍या अश्लील पोस्टशी माझा किंवा त्या मेसेजशी माझा कुठलाच सबंध नाही अशा फेक अकाउंट वर कोणी विश्वास ठेवू नये किंवा त्यास बळी पडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी सर्व नागरिकांना केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या