Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशघराची जागा पहावी बदलून..! पंजाबमधील शेतकरी अख्खे घरच करतोय स्थलांतरित, पहा VIDEO

घराची जागा पहावी बदलून..! पंजाबमधील शेतकरी अख्खे घरच करतोय स्थलांतरित, पहा VIDEO

दिल्ली | Delhi

‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ ऐवजी ‘घराची जागा पहावी बदलून’ अशी सुधारणा करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील शेतकरी सुखविंदरसिंग सुखी यांनी चक्क घर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान अख्खे घरच हलविण्यात येत असल्यामुळे हा संपूर्ण पंजाबातील एक चर्चेचा विषय झाला आहे. लोक दूरदूरून घराचे स्थलांतर पाहायला येत आहेत.

सुखविंदरसिंग सुखी यांनी सांगितले की “मी हे घर दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गात येत असल्याने ते स्थलांतरित करत आहे. मला नुकसान भरपाईची ऑफर देण्यात आली होती, परंतु मला दुसरे घर बांधायचे नव्हते. ते बांधण्यासाठी मी सुमारे १.५ कोटी रुपये खर्च केले आहेत”

- Advertisment -

ताज्या बातम्या