Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशSukha Duneke : कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खाची हत्या

Sukha Duneke : कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खाची हत्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

खलिस्तान्यांचे समर्थन करणाऱ्या आणखी एका खलिस्तानी समर्थकाची कॅनडात हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुखदूल सिंग (Sukhdool Singh ) असे गँगस्टरचे नाव आहे. सुखदूल हा पंजाबचा रहिवासी होता.

- Advertisement -

सुखदूलची हत्या अज्ञातांकडून गोळ्या घालून करण्यात आली आहे. त्याचे नाव एनआयएच्या वाँटेड यादीत असल्याचेदेखील समजते. सुखदूलवर खलिस्तान्यांना मदत करत असल्याचे आरोप होते.

मोठी बातमी! आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष धाडणार शिंदे, ठाकरेंना नोटीस

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री झालेल्या टोळीयुद्धात मोगा जिल्ह्यातील रहिवासी देविंदर बांबिहा टोळीचा सुखदुल सिंग उर्फ ​​सुक्खा दुनीके हा ठार झाला आहे. त्याच्यावर सुमारे 15 गोळ्या झाडण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

याआधी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडा सरकराने केला आहे. या आरोपांनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान आणखी एका गँगस्टरची हत्या झाली आहे. याबद्दल कॅनडा सरकार काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकलहरे-बेलापूर रस्त्यावर दरोडा; तरुणाची निर्घृणपणे हत्या, पत्नीला जबर मारहाण

कोण होता सुखदुल सिंग उर्फ ​​सुक्खा दुनीके?

सुखदुल हा पंजाबमधील मोगा येथील रहिवासी होता. 2017 मध्ये तो पंजाबमधून पळून कॅनडाला गेला. सुखदूल हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंगचा जवळचा मानला जात होता. 2017 मध्ये सुखदुल बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतातून कॅनडाला पळून गेला.

त्याच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल असून, त्याचा नावाचा समावेश एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होते. सुखदूल सिंग बराच काळ फरीदकोट तुरुंगात होता. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला असता बनावच पासपोर्टच्या मदतीने परदेशाच पलायन केले.

सुखदुलचे नाव नांगल आंबिया हत्याकांडातही त्याचे नाव समोर आले होते. त्याने शस्त्रे आणि शूटर पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. कॅनडाला गेल्यानंतर त्याने भारतात आपले नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Bribe News : चार हजारांची लाच घेतांना महिला अधिकाऱ्यास अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या