Thursday, September 24, 2026
HomeनगरJamkhed : अहिल्यादेवींच्या प्रतिमेसमोर नृत्य; चौंडीत संताप

Jamkhed : अहिल्यादेवींच्या प्रतिमेसमोर नृत्य; चौंडीत संताप

रथयात्रेत नृत्यांगनांच्या कार्यक्रमावरून नाराजी || सभापती शिंदेंकडून दिलगिरी

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (Chaundi) येथे नुकत्याच झालेल्या रथयात्रा उत्सवात अहिल्यादेवींच्या प्रतिमेसमोर नृत्यांगनांचा नृत्यविष्कार (Dance) सादर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अहिल्या भक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Speaker Ram Shinde) यांनी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. संबंधित आयोजकांना अनुचित प्रकार लक्षात येताच समज देण्यात आली होती.

- Advertisement -

व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर आयोजकांनी चूक मान्य करून जाहीर माफी (Apology) मागितली. भविष्यात चौंडी किंवा परिसरात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, अशी ग्वाही आयोजक व ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, सभापती शिंदे म्हणाले, चौंडीसह नान्नज, जवळा, चापडगाव आदी गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने रथयात्रा उत्सव साजरा होतो व कलाविष्कार सादर केले जातात. मात्र, अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाठीमागील फलकावर (बॅनर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो लावणे अत्यंत चुकीचे होते.

ताज्या बातम्या

उध्दव

Uddhav Thackeray: डबल इंजिन सरकार फक्त वाफ आणि धूर सोडतंय, “मागच्या...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत तातडीच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतची...