Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधस्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल

स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

मार्च – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-बुध-शनि, द्वितीयात शुक्र-गुरू-मेष, तृतीयात राहू-हर्षल, चतुर्थात मंगळ, नवमात केतू, व्ययात प्लूटो अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा अशी आहेत. राशीचेे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष आहे. राशी स्वामी शनि. तत्त्व वायु, राशी स्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जितक्या लवकर वर चढतो तेवढ्या लवकर खाली येतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष. तमोगुणी स्वभाव. काहीसा क्रूर. त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यांवर आहे.पायाला इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. शुभ रत्न-निलम, शुभ रंग-आकाशी,निळा, काळा. देवता- शनि, हनुमान. शुभ अंक-7, शुभ तारखा-8/17/26

तृतीयात हर्षल आहे. लेखक वर्गासाठी चांगल आहे. लेखनात सूर लागेल. प्रसिद्धी मिळेल. नावलौकीकात वाढ होईल. ग्रंथ प्रकाशनाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. विचीत्र स्वभावाच्या लोकांपासून दूर रहा. अन्यथा नुकसान होईल.

व्ययातील प्लुटोने खर्चाचे प्रमाण काहीसे वाढविले आहे. तरी अध्यात्मात प्रगती होऊन मानसिक शांतता मिळेल.

स्त्रियांसाठी – द्वतीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारी पाजारी हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 31

एप्रिल -2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी शनि, द्वितीयात रवि-बुध-गुरू-नेपच्यून, तृतीयात शुक्र-राहू – हर्षल, पंचमात मंगळ, नवमात केतू, व्ययात प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमस्थानी मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रसुख कमी असेल. पुत्राविषयी काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खाची संगत टाळावी. ऐशोआरामाची वृत्ती राहील. सट्टा, जुगाराच्या व्यवहारांपासून दूर रहा. जवळपास प्रवासाची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्राची आवड असलेल्यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमिकल्स, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र व शास्त्रीय विषयाशी संबंधित काम करणार्‍या लोकांची प्रगती होईल.

द्वितीय स्थानातील गुरुमुळे तुमचा विद्वत्तेबद्दल नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्त्वात विशेष यश मिळेल. केवळ शब्दाने लोकांवर हुकूमत गाजवता येईल. राजकारणी लोकांना याचा विशेष फायदा होईल. सुग्रास भोजन प्र्राप्त होईल. द्वितीया त गुरू असणे एक भाग्यप्राप्तीचा योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. कौटुंबिक सुख उत्तम राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल. नवीन कल्पनांच भांडार तुमच्यापुढे उघडे करेल. अन्य जनांचे लक्षही जाणार नाही अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने उद्योगधंदे ललितकला, कथालेखन, यापासून द्रव्यलाभ होईल. खर्चाच्या बाबतीत नियंत्रण आवश्यक आहे.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल. शुभ तारखा – 2, 3, 4, 7, 9, 10, 12, 15, 16

शुभ तारखा – 1, 2, 4, 6, 7, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 25, 26, 28, 29, 30

मे – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शनी, द्वितीयात – नेपच्यून, तृतीयात रवि-बुध-गुरु-राहू-हर्शल, पंचमात मंगळ-शुक्र, नवमात केतू, व्ययात प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात रवि आहे. पराक्रमाला जोर येईल. शरीरप्रकृती उत्तम राहील. समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाची छाप पडेल. शास्त्रीय विषय व ललित कला यांची आवड वाटेल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. प्रवासाची आवड वाटेल. व काहींना तशी संधीही मिळेल. राजकारणी लोकांची सत्तेकडे वाटचाल सुरू होईल. कोणत्याही प्रकारच्या लोकांशी सहज जमवून घेऊन त्यांच्याशी मैत्री करणे जमेल. स्पर्धात्मक कार्याक्रमात भाग घ्यावासा वाटेल. अशा संधीचा अवश्य लाभ घ्यावा यश मिळण्याची हसखास शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली राहील.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन राहील. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावईदेखील सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल. शत्रूवर विजय मिळवाल. प्रेमप्रकरणात फसगत होण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. लेखन, जुगार, सट्टा यांपासून लाभ होतील.

स्त्रियांसाठी –महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी-अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही.कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 2, 3, 4, 7, 9, 10, 12, 15, 16, 21, 22, 24, 25, 28, 29, 30

- Advertisment -

ताज्या बातम्या