Friday, May 3, 2024
Homeजळगावआर. आर. विद्यालयाजवळ अवैध वाळूचे ट्रॅक्टर उलटले

आर. आर. विद्यालयाजवळ अवैध वाळूचे ट्रॅक्टर उलटले

जळगाव – jalgaon

शहरातील आर.आर. विद्यालयासमोर(R. R school) सोमवारी सकाळी ११ वाजता वाळून भरलेलेल्या ट्रॅक्टरच्या (sand tractor) ट्रॉलीचे चाक खड्ड्याने गेल्याने एक्सल तुटून अपघात (Accident) झाला. अवैध वाळू (Illegal sand)असल्याने कारवाईच्या भितीने चालक (Driver) ट्रॉली तशीच रस्त्यावर सोडून पसार झाला. रस्त्यात वाळूसह ट्रॉली (Traffic congestion) यामुळे काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

- Advertisement -

स्टेटबँक ते नवीन बी.जे. मार्केट रोडने वाळूने भरलेले ट्रॅक्टर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रॉली सहीत जात होते. आर. आर. विद्यालयासमोर आलेल्या रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात अचानक ट्रॉलीचे चाक गेल्याने पडलेल्या खड्डयामुळे ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या चाकाचे एक्सल तुटला. त्यामुळे चाक निखळल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान हे वाळूचे ट्रॅक्टर कुणाचे आहे हे अद्याप कळू शकले नाही. त्याचप्रमाणे शहरात वाळूच्या वाहतूकीला पुर्णपणे बंद असतांना भरदिवसा अवैध वाळूची वाहतूक होत आहे हे या वरून समोर आले असून महसूल प्रशासन कारवाई करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या