Friday, May 3, 2024
Homeनाशिकआदिवासी विद्यार्थ्यांना रेडिओवाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना रेडिओवाटप

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

रोटरी क्लब ऑफ नाशिक ईस्टतर्फे इगतपुरीतील अतिदुर्गम भागातील दिडशे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मोफत रेडिओ वाटप केले.

- Advertisement -

तसेच मिठाई, शालेय साहित्यही दिले. आदिवासींना मास्क आणि करोना रोगप्रतिकारक औषधांचे वाटप केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष गौरव बडवे, सचिव सुशिल अमेसर, महेश उपाध्ये, दौलत देवानी, रावसाहेब दुनबळे, गोरख खैरनार, रूपेश वाघ उपस्थित होते. शाळा बंद पण शिक्षण चालू, डोनेट अ डिव्हाईस या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रम झाले.

इगतपुरी तालुक्यातील अतिवृष्टीच्या डोंगराळ प्रदेशातील तारांगण पाडा, ठाकूरवाडी (तळोशी) या आदिवासी गावातील विद्यार्थ्यांना करोनामुळे शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्या. ते ओळखून रोटरीने शैक्षणिक कार्यक्रम ऐकण्यासाठी मोफत एफएम रेडिओचे वाटप केले. गावातील पहिली ते पाचवीपर्यंतच्या दीडशे आदिवासी विद्यार्थ्याना शालेय साहित्य, दिवाळीनिमित्त मिठाई वाटप केले.

गावांमधील आदिवासी बांधवांचे करोना आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी मोफत उच्च प्रतीचे मास्क त्याबरोबर तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या